श्री सदगुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट कोल्हापूर
सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व अध्यात्मिक उन्नती केंद्र
दादा- दादा महाराज – माधवनाथ सांगवडेकर ! नावं वेगळी पण व्यक्ती एकच ! गुलाबाला कोणत्याही नवानं हाक मारा – सुगंध तोच, तसंच दादाचं ! तेच प्रसन्न हास्य, मृदू मावळ बोलण – तोच कृपा कारुण्यानं ओथंबलेला स्पर्श, दिक्कालाचे वेध घेणारी तेजस्वी दृष्टी. माऊलीनं सगितलेल्या ‘अमनित्त्व’ या गुणांचा सगुण साक्षात्कार म्हणजेच श्री दादा महाराज सांगवडेकर – एक अलौकिक विभूती आणि समर्थ सदगुरु !!!
अशा परमपूज्य श्री सद्गुरु दादा महाराज सांगवडेकर यांनी निर्माण केलेला श्री विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व अध्यात्मिक कार्याद्वारे समाजामध्ये नीतीमूल्यांची जोपासना करण्याचे कार्य करत आहे. आज देशाला संत – विचारांची गरज असून विज्ञानाला ज्ञान व विवेकाची जोड मिळाल्यास देशाची प्रगती जोमाने होऊन संपूर्ण जगात भारताचा नांवलौकिक द्विगुणीत होईल असा आमचा ठाम विश्वास आहे. आज संपूर्ण जग एक वैश्विक खेडं बनू पाहत असताना वैचारिक जवळीकता व विश्वबंधुत्व प्रस्थापित होणे गरजेचे आहे. समस्त भूतमात्रांमध्ये ईश्वराचा अंश आहे असे प्रतिपादन करून भेदाभेद नष्ट करणारे व संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी पसायदान मागणारे संतश्रेष्ठ श्री सद्गुरु ज्ञानेश्वर माऊली हे आमचे आराध्य दैवत आहे. आपले उदिष्ट साध्य करण्यासाठी ट्रस्ट विविध उपक्रम राबवीत असतो.
सामाजिक उपक्रम
दु:खी व पीडित व्यक्तींच्या वेदना समजण्याइतपत आपले हृदय संवेदनशील हवे. दु:खी व पीडित व्यक्तींच्या आत्म्यामध्ये ईश्वर दु:ख भोगत असतो. दु:खी, पिडीत व रुग्णांची सेवा म्हणजेच ईश्वराची सेवा आहे.
- वृद्धाश्रम, कष्टधाम, अपंग संस्थांना कुवतीनुसार मदत
- पूरग्रस्तांना मदतीचा हात
- एड्स ग्रस्त लहान मुलांसाठी मदत
- अनाथ मुलांसाठी सेवा
- अनाथ, एड्स ग्रस्त, बालमजूर व गोरगरीबांसाठी अन्नदान सेवा
- अपंगसाठी मोफत कृत्रिम साधनांचे वाटप
शैक्षणिक उपक्रम
अशिक्षितता हा मोठा शाप आहे व शिक्षण हा देशाच्या प्रगतीचा पाया आहे.
- गरीब व गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप
- गरजू व हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
- दहावी नापास विध्याथ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी प्रयत्त्न व शैक्षणिक मार्गदर्शन
- विद्यार्थ्यांसाठी सुट्टीत सुसंस्कार वर्ग
- वाचनालय सुविधा
सांस्कृतिक उपक्रम
संस्कृती मनुष्य प्राण्याला मानव बनविते. मनुष्य सुशिक्षित असण्याबरोबर सुसंस्कृत व्हायला हवा तरच समाज नीतीमान बनेल. आज प्रत्येक नागरिकाला प्राचीन भारतीय संस्कृतीचं आकलन व जाणीव यायला हवी. ज्ञान व विज्ञानाला विवेक व संयमांची जोड संस्कृती देऊ शकते.
- संस्कार वर्गाचे आयोजन
- शास्त्रीय गायन कार्यक्रम
- योगासन, प्राणायाम शिबीर
- तणाव मुक्ती शिबीर
अध्यात्मिक उपक्रम
“विश्वपंढरी” मासिक
साधकांची आध्यात्मिक उन्नतीसाठी म्हणून “विश्वपंढरी” या मासिकाची निर्मिती करणेत आली. आध्यात्मिक क्षेत्रातील सर्व पंथीयांची माहिती, त्या त्या परंपरेतील संत, त्यांचे साहित्य, लोकमानसातील त्यांची प्रतिमा या गोष्टींची माहिती आपल्या साधकांना व्हावी. विशेषत: ज्ञानेश्वरीच्या अंगाने संतसंग घडावा, नाथपरंपरा दृढ व्हावी हा उद्देश प्रामुख्याने राहिल. गेली ८ वर्ष अव्याहतपणे “विश्वपंढरी” मासिकाची वाटचाल सुरु आहे.
अध्यात्म हा ट्रस्टचा गाभा आहे. ज्याच्यामुळे महाराष्ट्राला संतभूमी महणून ओळखले जाते त्या श्री ज्ञानेश्वर माऊलीपासून प्रवाहित झालेली परंपरा या ठिकाणी कार्यरत आहे. देव दर्शनाचा पाया ध्यान हाच आहे देवाच्या मूर्तीचे रूप उघड्या डोळ्यांनी दिसते पण देवाच्या स्वरूपाचे दर्शन घेण्यासाठी ‘ध्यान’ करायला हवे. सुशिक्षीत व सुसंस्कृत मनाला अध्यात्मामुळे वैचारिक प्रगल्भता, विवेक व संयम प्राप्त होतो.
- विविध मान्यवर सत्पुरुषांचे प्रवचन / कीर्तनाद्वारे समाज प्रबोधन
- भजन व अभंग गायन कार्यक्रम
- फलटण ते पंढरपूर पायी चालत आषाढी वारी
- गुरुपौर्णिमा कार्यक्रम
- ध्यान धारणा शिबीर
- ज्ञानेश्वरी, गुरुचरित्र, सिद्धचरित्र आदी
- पौराणिक ग्रंथाचे सामुदायिक पारायण
वैद्यकिय उपक्रम
- गरीब व गरजू रुग्णांना मोफत आयुर्वेदिय औषधोपचार.
- सुसज्ज श्री विश्ववती आयुर्वेदिय पंचकर्म चिकित्सालय व संशोधन केंद्र .
- श्री विश्ववती आयुर्वेदिय उत्पादने.
- विविध कार्यक्रमाचे औचित्य साधून आरोग्य शिबीराचे आयोजन.
- आषाढी वारी दरम्यान फलटण ते पंढरपूर मार्गावर मोफत आयुर्वेदिक उपचार.
- विभिन्न तीर्थक्षेत्री मोफत आरोग्य सेवा या माध्यमातून करवीर नगरीत महाराष्ट्रात गेली १० वर्ष कार्यरत आहे.