सुमारे साडेतीनशे वर्षापूर्वी, गुजरातमधील एका सधन आणि धर्मपारायण कुटुंबात याचं जन्म झाला. बालपणापासून ईश्वरभक्त असलेल्या देवनाथांना त्यांचे कुलदैवत असलेल्या, द्वारकेच्या कृष्णाची भक्ती जडली होती. त्यांना श्रीकृष्णाच दर्शन झालं… श्रीकृष्णाच्या आज्ञेने ते आई भगवतीची उपासना करू लागले. श्री देवनाथांच्या खडतर उपासनेने प्रसन्न होऊन आई भगवतीने शास्वत सुखाच्या प्राप्तीसाठी त्यांना आळंदीला श्री ज्ञानेश्वर माऊलींकडे जाण्यास सांगितले. सर्वसंगपरित्याग करून श्री देवनाथ महाराज आळंदीस आले. तेथे त्यांना श्री ज्ञानेश्वर माऊलींनी दर्शन दिले. प्रसाद म्हणून श्री ज्ञानेश्वरी दिली आणि परंपरेचा प्रसार करण्यास सांगितलं.
श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या आदेशानुसार, नाथपरंपरा प्रसार करण्यास निघालेल्या श्री देवनाथांनी, देगलूरच्या श्री चूडामणी महाराजांना अनुग्रह दिल. श्री देवनाथ महाराजांनी प्रवाहित केलेली हि परंपरा विविध ठिकाणी आजतागायत सुरु आहे. नागपूरचे श्री रामचंद्र बुटी महाराज, गुंडा महाराज देगलूरकर, श्री रामचंद्र महाराज तिकोटेकर, श्री विश्वनाथ महाराज रुकडीकर, पावसचे श्री स्वरूपानंद स्वामी …. हे संत याच परंपरेतील ! देगलूर, नेवासे, पंढरपूर इ. ठिकाणी जाऊन देवनाथ महाराज पैठणला आले. इथे त्यांनी बराच काळ वास्तव्य केलं … आणि श्री पांडुरंग, श्री ज्ञानेश्वर माऊलींची आणि श्री एकनाथ महाराजांची आज्ञा घेऊन, गोदामाईच्या पवित्र तीरावर संजीवन समाधी घेतली.