श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय व औषधे
१) आम्लपित्तनाशक वटी
२) पाचक वटी
३) सुखसारक वटी
४) मूळव्याधीचा गोळा
५) केश्य तेल
६) फेस पॅक
७) कोरफड जेल
८) आयुर्वेदिक शाम्पू
९) च्यवनप्राश
१०) अभ्यंग तेल
११) भेगारी मलम
१२) दंतरोगहर व तेल व दंतमंजन
१३) कर्ण बधिर्य तेल
१४) सर्दीचा लेप
१५) टोन्सिलचे तेल
१६) बेड वेटींग चूर्ण
१७) चामखिळ योग
१८) बुद्धी स्मुती एकाग्रता वर्धक औषध
१९) नारायणी कल्प
२०) संधीशूलहर तेल
२१) ज्ञानशक्ती ड्रॉप्स
पंचकर्म चिकित्सा
आयुर्वेद चिकित्सेमध्ये शोधन व शमन या प्रकारांपैकी शोधन चिकित्से अंतर्गत पाच कर्मांचा सामुदाय म्हणजे “पंचकर्म” यामध्ये खालील कर्म येतात .
१) वमन
२) विरेचन
३) बस्ति
४) नस्य
५) रक्तमोक्षन
१) वमन
उलटीचे औषध प्यायला देऊन तज्ञ वैद्यांच्या देखरेखीखाली प्रकृतीनुसार ठरवून दिलेले आहार – विहाराचे पथ्य पाळणे आवश्यक असते .
उपयोग : त्वचा रोग , डायबेटीस, टीबी , दमा .
२) विरेचन :
जुलाबाचे गोळी देऊन जुलाब करविणे यामध्ये वैद्यांच्या देखरेखीखाली प्रकृतीनुसार पथ्य पाळणे व आहार – विहार करणे फायद्याचे असते .
३) बस्ति
शौचाच्या मार्गाने औषधीयुक्त काढे ,तेल ,दुध इ . मोठया आतड्यात सोडणे.
उपयोग : किड्णीचे विकार, पोट फुगणे , मलावरोध , मूतखडा, इ .
४) नस्य
नाकात औषध सोडणे.
उपयोग : कृमी , डोळे येणे , चक्कर येणे , आवाज बसणे , वाचा बंद होणे, इ .
५) रक्तमोक्षन
शरीरातील दूषित रक्त काढणे.
उपयोग : डोके जड पडणे , मेंदूचे आजार, हात आखडणे , त्वचा रोग, डोळे येणे, इ .
पोटाचे विकार
आपण घेतलेल्या आहाराचे पचन करून शरीर घटकामध्ये रुपांतर करणारा भाव म्हणजे अग्नी होय . आयुर्वेदशास्त्राप्रमाणे हा अग्नी मंद झाल्यामुळे बहुतांश रोग होतात असे सांगितलेले आहे . योग्य ते निदान न झाल्यामुळे व तात्पुरते उपचार करत राहिल्यामुळे वर्षानुवर्षे पोटाच्या तक्रारी ब-या होत नाही. अग्नी विकृती हे यामागचे मूळ कारण असते .
१) मधुमेह
२) उच्च राक्तदाब
३) हृदयविकार
४) मूतखडा व किडणीचे विकार
यासर्व मोठ्या अवयवा संबंधितिल आजारामागे पचनाच्या तक्रारी हेच मूळ कारण असते . म्हणूनच वेळीच तज्ञ वैद्यांशी संपर्क साधून आहार विषयक माहिती व संपूर्ण औषधी व पंचकर्म चिकित्सा घ्यावी .
संधिवात व पाठीच्या मणक्याचे विकार
आयुर्वेदिक उपचाराच्या सहाय्याने आपण संधिवात व पाठीच्या मणक्याचे विकारांचे व त्याच्या लक्षणांचे पूर्णतः निराकरण करू शकतो. अभ्यंतर औषधोपचाराच्या सहाय्याने मणक्याची होणारी झीज कमी होते. संधी , अस्थि , मांस व स्नायू यांचे बल वाढते . औषधी तेलाने अभ्यंग , षष्टीकपिंडस्वेद , इत्यादी पंचकर्म उपचार करून घेतल्यास फायदा होतो.
सोरियासिस व त्वचा विकार
विरुद्ध आहार सेवन करणे, भूक लागली नसतानासुद्धा खाणे , मल -मूत्रादिची संवेदना झाल्यानंतरसुद्धा ती धरून ठेवणे, अतिप्रमाणात तिखट, तेलकट , खराट खाणे , दही , मासे , शिकरण यासारख्या अभिष्यदी पदार्थ खाल्यामुळे शरीरातील पाचक अग्नीवर ताण येतो .
१) सोरियासिस
२) नायटा
३) जळवात
४) केस गळणे
५) केसातील कोंडा
६) केस पिकणे
यासाठी अभ्यंतर औषधे घेणे, बस्ती , वमन, विरेचन , विविधप्रकारचे लेप अशा माध्यमांतून चिकित्सा घेतल्यास त्वचाविकार व सौंदर्य विषयक तक्रारींपासून मुक्तता मिळू शकते.
श्री . क्षेत्राच्या ठिकाणाची सेवाभावी शिबीर
प्रत्येक एकादशीस
> आळंदी (पुणे)
> त्रंबकेशवर (नाशिक)
> पैठण (औरंगाबाद), शुद्ध एकादशीस
दर पौर्णिमा
> नृसिंहवाडी (कोल्हापूर)
> पारडसिंगा (नागपूर)
अमानी (वाशिम) १ ला मंगळवार
सिद्धिविनायक मंदिर (मुंबई) ४ था मंगळवार.
सांगवडे (कोल्हापूर) तिसरा बुधवार.